Similar Posts
कळली ना तुला रे
भावना माझ्या मनाचीकळली ना तुला रे ….लागली ओढ तुझ्या प्रेमाचीतुझ्यात मी वेडी रे…. धडधड वाढते हृदयाचीवाट तुझीचं पाहते रे….रीघ लागली तुझ्या स्वप्नांचीस्वप्नात मी त्या रंगून जाते रे….. आस लागते तुझ्या भेटीचीक्षणोक्षणी भास तुझाचं रे…..घालमेल माझ्या मनाचीकळली ना तुला रे….
काय सांगावे ह्या वेड्या मना….
काय सांगावे ह्या वेड्या मना ,तुझ्याचसाठी झुरते क्षण क्षण |उरले ना काही भान त्याला ,तुझ्यात अडकले हे बावरे मन डोकाऊनी बघते तुलाचं हे मन ,स्वप्नातही बघे तुलाचं प्रति क्षण |गुंतुनी बसले हृदयात तुझ्या ग ,काय सांगावे ह्या वेड्या मना ग |
सजली रे तुझ्याचं साठी
सजली रे मी तुझ्याचसाठी ,नटली रे मी तुझ्याचसाठी |तरीही बघेना तू ह्या वेडीकडं ,सांग ना कधी बघशील रे माझ्याकडं नयनी लावले मी काजळ ,डोळ्यात बघ माझ्या आभाळ |वेडा होशील तू माझ्यासाठी ,सजली रे मी तुझ्याचसाठी…. कपाळी शोभते माझ्या चंद्रकोर ,गळ्यात घातला देखणा हार |आतुरला जीव तुझ्या भेटीसाठी ,सजली रे मी तुझ्याचसाठी….. केसांत माळला गजरा मी…
शोधते तुलाचं रे सख्या
शोधते तुलाचं रे सख्यारानात , पानात , फुलातफुलांच्या रसाळ मधातशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाच रे सख्यामनात ,हृयात , नयनातनयनांच्या प्रत्येक अश्रुतशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाचं रे सख्यानदीत , झऱ्यात , पावसातपावसाच्या प्रत्येक थेंबातशोधते तुलाचं रे सख्या….. शोधते तुलाचं रे सख्यासुरात , तालात , गाण्यातगाण्याच्या प्रत्येक शब्दातशोधते तुलाचं रे सख्या….
मी होतो किनारा तू
मी होतो किनारातू लाटा होशील का ?एक क्षण का होईनामला भेटशील का ? मी आकाश होईलतू चांदणी होशील का ?रात्री स्वप्नात येऊनिमनात टीमटीमशील का ? मी होईल गुलाबतू सुगंध होशील का ?मनात माझ्या येऊनीतू दळवळशील का ?
माझेच मला नाही कळले
माझेच मला नाही कळले ,मन हे तुझ्याकडे कधी वळले |हरवून बसलो मी स्वतःला ,वेड तुझे हे लागले मनाला तुला पाहताच मन घायाळ झाले ,तुझ्या ह्रदयात ते गुंतून बसले |कसं समजावू है वेड्या मनाला ,उगाच भाळला तुझ्या प्रेमाला |
